bjp ashish shelar tweet on Amit Shah mumbai visit during ganesh festival 2022 maharashtra politics
bjp ashish shelar tweet on Amit Shah mumbai visit during ganesh festival 2022 maharashtra politics 
महाराष्ट्र

'हा खोडसाळपणा फारच हास्यास्पद'; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबाबत शेलारांचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही दिवसांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान भाजपचे नेते मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी या दौऱ्याबाबत माध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्या दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. (Amit Shah Mumbai Visit)

आशिष शेलार यांनी "देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या घोशित कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य राजकीय भेटीसाठीबाबत कपोलकल्पित, उलटसुलट बातम्या चालवण्याता खोडसाळपणा स्वखुशीने माध्यमांमध्ये सुरु आहे, तो फार हास्यास्पदच." असे म्हटले आहे. "अमितभाईंच्या मुंबई दौऱ्यात नेहमीच अशा टेबलस्टोरींना ऊत येतोच, दुर्दैवी!", असे शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री हे मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. ही भेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये देण्यात आल्या होत्या.

अमित शाह हे येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. या भेटी दरम्यान ते लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देतील. तसेच आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील ते भेट घेणार आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. तसेच शाह हे फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान 'सागर' बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी, मुंबईतील आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT