sharad pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती; भाजपची शरद पवार यांच्यावर टीका

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सामनातील बातमीचा फोटो पोस्ट करून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई - रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावरून शिवसेना (Shivsena) आमदार महेश शिंदेंनी (Mahesh Shinde) केलेल्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माझी उंची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असं त्यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमदार महेश शिंदे यांनी आपला मेंदु तपासून पाहावा असं म्हटलं होतं. यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.

भातखळकर यांनी ट्विटरवर सामना वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा फोटो टाकला आहे. त्याला बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती असा कॅप्शन दिला आहे. यात सामनाच्या पहिल्या पानावर बाळासाहेब ठाकरेंचा सभेला संबोधित करत असलेला फोटो आहे. त्या बातमीचे शीर्षक ''निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरू' असे आहे.

याआधीही भाजपकडून बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचे संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर टीकास्र सोडले आहे. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका करणारे ट्विट केले आहे. त्यात म्हटलं की, घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्णसुद्धा सहा महिन्यांनी जागा व्हायचा, हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत यावरून अनेकांनी टीका केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की, मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होतेय, या टीकेकडे शांतपणे पाहतोय. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो, येत्या निवडणुकीच्या तयारीला लागा. मी कामानेच माझी पोचपावती देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT