chandrakant bawankule uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाही; बावनकुळे यांची बोचरी टीका

सकाळ डिजिटल टीम

BJP Chandrashekhar Bawankule criticize Uddhav Thackeray

मुंबई- सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाहीये. पुन्हा सत्तेत यायची संधी नाहीये. पक्ष फुटलाय, पक्षाचं चिन्हही गेलंय. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आली आहे. त्यामुळे आता आयुष्यात कधीही सत्तेत येऊ शकत नसल्याचं त्यांना दु:ख आहे. त्यांना दोन प्रकारचं दु:ख आहे. एक सत्ता गेल्याचं आणि दुसरं कधीही सत्तेत न येण्याचं, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये.

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. येत्या निवडणुका एकनाथ शिंदे, अजित पवार गट आणि भाजप एकत्रच लढणार आहे. विरोधक काहीही बोलत असतात.बहुमत असलेलं आमचं सरकार आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील आणि पुढेही राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी भाष्य केलं. कॅगने रिपोर्ट दिलाय. एखाद्या योजनेवर खर्च वाढू शकतो. कॅगला याबाबत योग्य उत्तर दिले जाईल. उत्तर समाधानकारण दिल्यास पॅरा कमी होतो. नितीन गडकरींना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न नाही. विरोधकांकडून हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण, नितीन गडकरी आमचे नेते आहेत, असं ते म्हणाले.

आमच्यात टाचणी टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. नितीन गडकरी यांनी देशासाठी मोठं काम केलेलं आहे. ते प्रगल्भ नेते आहेत. विरोधकांना बोलावं लागतं. काँग्रेसमध्ये दहा तोंड दहाकडे आहेत. त्यांना वाटतं भाजपमध्येही असं व्हावं म्हणून ते असं बोलत राहतात, अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन संभ्रम निर्माण करण्यात येत आहे, असं बावनकुळे म्हणाले. आमच्या महायुतीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT