Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : ''पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे भाजप प्रदेशाध्यक्षांना ठाऊक आहे, त्या राष्ट्रवादीतच येणार''

संतोष कानडे

मुंबईः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागच्या काही दिवसांपासून पक्षामध्ये घुसमट सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातच त्यांना बीआरएस आणि एमआयएम पक्षाने ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या.

आज राष्ट्रवादीच्या आमदाराने थेट भाष्य करुन त्या राष्ट्रवादीतच येत असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे खरंच पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंकजा मुंडे यांना भाजपने वारंवार डावललं. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच भाजपवर संताप व्यक्त करण्यात येतो. अनेकदा खुद्द पंकजा मुंडेंनीही खदखद बोलून दाखवलेली आहे. नुकत्याच गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अमित शाहांना याबाबत स्पष्ट विचारणार असल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर पुन्हा पंकजांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या. बीआरएसने तर त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली. तर दुसरीकडे एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी पंकजांना आधीच ऑफर दिल्याचं स्पष्ट केलं. शिवाय त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा नेहमीच सुरु असतात.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे राष्ट्रवादी येणार असल्याचं स्पष्ट करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत माहिती असल्याचं म्हटलं आहे. वैद्यनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले. तसेच ते पक्षात एकत्र काम करतील, असं मिटकरी म्हणाले.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

खडसे साहेब पंकजा मुंडेंना भेटायला गेले होते. तेव्हापासून बघत आहोत त्यांना भाजपकडून वारंवार चुकीची वागणून दिली जात आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या निमित्ताने दोघे बहीण-भाऊ एकत्र आले होते. त्यामुळे त्या पक्षात याव्यात असं मला वाटतं.

बीआरएस अफुची गोळी आहे. हे गुलाबी वादळ असून पंकजा मुंडे तिकडे जाणार नाहीत. पंकजाताई थोड्यात दिवसात राष्ट्रवादीमध्ये येतील हे चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माहिती आहे. त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्रात लीड करु शकतात, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला. ते 'टीव्ही९'शी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT