BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Death Threat :'...हे आमच्या रक्तात नाही'; पवारांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी भाजपची पहिली प्रतिक्रिया

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून तुझा दाभोळकर केला जाईल अशा स्वरूपात जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यातच धमकी देणाऱ्याव्यक्तीच्या ट्विटर बायोमध्ये 'मी भाजपचा कार्यकर्ता आहे' असे म्हटले आहे. यावरून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. ( Sharad Pawar Death Threat

भाजपकडून याबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली आहे, भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो भाजपचा असो की काँग्रेसचा असो की राष्ट्रवादीचा असो… धमकी देणं हे आमच्या रक्तात नाही. जो असेल त्याला अटक केली पाहीजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे असे बावनकुळे म्हणाले आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकीप्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आय़ुक्तांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशी धमकी येणं हे दुर्दैवी असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, जर काही झालं तर फक्त आणि फक्त देशासह राज्याचे गृहमंत्री जबाबदारी असतील, असा इशारा सुळे यांनी दिला आहे.

तसेच यावेळी त्यांनी या धमकीचा पाठपुरावा करुन जो काही काही योग्य न्याय असेल तो आम्हाला मिळालाचा पाहिजे. या सगळ्याची जबाबदारी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांवर आहे. मी एक महिला आणि नागरिक म्हणून राज्याच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT