BJP Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Vidarbha Visit Pohradevi political news  
महाराष्ट्र बातम्या

BJP On Uddhav Thackeray : '...विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय'; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपची खोचक टीका

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्यानं केली आहे. आजपासून ते दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान ठाकेरेंच्या या दौऱ्यावर भाजपकडून जोरदार निषणा साधण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. "सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय."

"सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे." असेही ते म्हणाले आहेत.

"उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका." असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला आहे.

येथे होणार सभा

उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यानंतर वाशिममध्ये पोहरादेवीच्या दर्शनानं ते आपल्या दौऱ्याची सुरूवात होईल. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे सभा होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे गाड्यांची वेळ बदलणार, मध्य रेल्वेची घोषणा; कधीपासून होणार नवे वेळापत्रक लागू?

Alphonso Mango Price : हापूस आंबा अडीच हजार रुपये डझन; वाशी मार्केटला रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक पेट्या रवाना

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

पैशांचा पाऊस! 8.5 कोटींच्या नोटांनी झाकला डान्स फ्लोअर; शाही लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल, एवढी मोठी कॅश पाहून वऱ्हाडी मंडळीही अवाक्

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात टेम्पो दुचाकीमध्ये भीषण अपघात, तीन जण जखमी

SCROLL FOR NEXT