Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : "तडीपार लोकांना सोबत घेऊन कसबा पेठेत दहशद निर्माण केली" नाना पटोले गरजले

महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकतील नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या ठिकाणी अनेक नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, राज्य सरकार झोपलेल्या अवस्थेत आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आम्ही सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, लाईट मिळत नाही त्याविषयी आम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचंही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

तर काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये कधीच वाद नव्हता. त्याचं वातावरण निर्माण झालं. आपण पहाल 2 तारखेला जे निकाल येतील तेव्हा महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

तर भाजपने महाराष्ट्राचा बिहार केला आहे. पोलिसांच्या साक्षीने त्यांनी पैसे वाटले. तडीपार लोकांना सोबत घेऊन कसबा पेठेत दहशतवाद निर्माण केल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला आहे. तर या अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं पटोले म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT