BJP Devendra Fadanvis slam Uddhav Thackeray sharad pawar over bhagatsingh koshyari controversy political news  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं; फडणवीसांचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. याप्रकरणी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिल्या यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे.

उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवार यांच्या लक्षात आलं की, आपल्या समोर घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया देखील दिली नाही. ते उदयनराजेंनी दाखवून दिल्यानंतर आज शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आणि शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्याला राजकीय रंग कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न होतायत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पवार काय म्हणालेत..

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जबाबदार पदावर बसून राज्यपाल सतत विधान करत आहे..याबाबत राष्ट्रपती , पंतप्रधान यांनी दखल घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच निकाल लावाला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की..

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांसमोर येत भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता, ठाकरे म्हणाले की, राज्यपाल यांनी आधीची वादग्रस्त विधाने केली. छत्रपती जुने आदर्श होते, असं राज्यपाल म्हणाले. बाप हा बापच असतो. तो जुना आणि नवा नसतो. छत्रपती आमचं दैवत आहे. मात्र हे विधाने केवळ राज्यपालांच्या काळ्या टोपोतून आलेले नाहीत. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, याचा शोध घ्यावा लागेल.

सीमाप्रश्नावर फडणवीस म्हणाले की...

दरम्यान कर्नाटक सोबत सुरू असलेल्या सीमाप्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यनिर्मीती झाली तसं हा प्रश्न आहे, संविधानाच्या अंतर्गत राज्याचे अधिकार आहेत. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि सर्व पुरावे सादर केले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. त्यामुळे कोणी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गावं जाणार नाही असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT