bjp gopichand Padalkar reaction to shoe throwing 
महाराष्ट्र बातम्या

'भेकडांच्या अंगावर कपडे...'; चप्पलफेक प्रकारावरुन गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

भाजप आमदार गोपीचंद पडळवर यांच्यावर शनिवारी चप्पलफेकीची घटना घडली होती. यावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात येत आहेत

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप आमदार गोपीचंद पडळवर यांच्यावर शनिवारी चप्पलफेकीची घटना घडली होती. यावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच अनेक ठिकाणी धनगर बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केलीये. पडळकर यांनी 'एक्स'वर व्हिडिओ पोस्ट करुन या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत शांततेनं एल्गार मेळाव्यातून आपली भूमिका मांडत आहे. इंदापूरमधील सभेनंतर शेतकऱ्यांच्या दूधाला दर मिळावा यासाठी उपोषणाला बसलेल्यांना भेटण्यासाठी जात असताना ही नौटंकी घडली. त्यानंतर भेकडांनी नौटंकीबाजी करत माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा दावा केला. अशी बातमी त्यांनी पसरवी. मला याची कीव वाटते, असं ते म्हणाले.

आम्ही याआधीच मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. पण, मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांनी कधी कोणाची घरं जाळली, गाडीवर दगडं फेकलं, शिव्या दिल्या. यावरुन स्पष्ट होतंय की, समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रात अंशातता हवी आहे. दंगली घडवायच्या आहेत, असं ते म्हणाले.

या सर्व प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे. कारण तो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. मी जर काल शांततेची भूमिका घेतली नसती तर या भेकड्याच्या अंगावर कपडे देखील शिल्लक राहिले नसते, असा इशारा त्यांनी दिला.

मी ओबीसी आणि धनगर समाजाला आवाहन करतो, की त्यांनी शांततेत लढाई लढावी. याचे उत्तर कोणतीही हिंसा न करता द्यावं. डॉ. आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ११ डिसेंबरला विधानभवनाभोवती इशारा मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन पडळकर यांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT