Pankja munde
Pankja munde E sakal
महाराष्ट्र

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते विधानपरिषदेची हुकलेली उमेदवारी, पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास

हलिमाबी कुरेशी

भाजपाने विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यात भाजपाने दोन नवीन चेहऱ्यांनाही संधी दिलीय. यात भाजपाचे महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत भारतीय, तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या उमा खापरे यांचा समावेश आहे. तसेच भाजपने माजी मंत्री राम शिंदे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी घोषित केलीय. या पाचही जणांचे अर्ज भरले जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

या यादीत मात्र पंकजा मुंडेंचा पत्ता कट करण्यात आलाय. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. पण केंद्राने त्याच्यासाठी भविष्यात काही विचार केलेला असेल, पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस असल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

३ जूनला गोपीनाथ मुंडेच्या पुण्यतिथीच्या दिवशी गोपीनाथ गडावर भाषण करताना पंकजा मुंडेंनी ''संधींची वाट पाहण हा स्वभाव नाही, पण संधी मिळाली तर त्यांचं सोनं करेन'' असं म्हणत विधानपरिषदेसाठी इच्छूक असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी अतिशय चुरशीच्या निवडणुकीत पराभव केला होता. आपण पराभव स्वीकारला असून आता गरीबांच्या कामासाठी उपलब्ध असेन असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसेच कार्यकर्त्यांनीही पराभव स्वीकारावा असं म्हणाल्या होत्या. हा निकाल त्यांच्यासाठी अनपेक्षित होता.

गोपीनाथ मुंडेच्या राजकिय वारसदार-

गोपीनाथ मुंडे केंद्राच्या राजकारणात गेल्यानंतर गोपीनाथ मुंडेचा राजकिय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिल जात होतं. मात्र २००९ मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेतून निवडून गेल्यानंतर पंकजा मुंडेंना परळी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले होते. धनंजय मुंडेंना विधानपरिषदेत संधी देण्यात आली मात्र त्यांची नाराजी गेली नाही. २०१२ मध्ये त्यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदावर आपला उमेदवार निवडुन आणला होता. २०१३ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

२००९ मध्ये आमदार झाल्या-

गोपीनाथ मुंडे २००९ साली दिल्लीत खासदार म्हणून गेले आणि पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट मिळवून दिलं. पंकजा मुंडे यांचा २००९ च्या निवडणुकीत विजय झाला, त्यांच्यविरोधात कॉंग्रेसच्या टी पी मुंडेंनी निवडणुक लढविली होती. पुढे २०१९ मध्ये टी पी मुंडेंनी भाजपात प्रवेश केला.

२०१४ साली झाल्या मंत्री-

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पुन्हा निवडून आल्या. यावेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असा थेट सामना झाला. या पराभवानंतर धनंजय मुंडेंना विधानपरिषदेतून राष्ट्रवादीने संधी दिली होती. पुढे ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता झाले.

''मी तर लोकांच्या मनातील मुख्यमंत्री'' -

२०१४ मध्ये पंकजा मुंडेंना ग्रामविकास मंत्रालयाबरोबरच, महिला व बालवकल्याण खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं. २०१४ च्या कार्याकाळात पुण्यात भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांनी आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं. तेव्हा राज्यात त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा झाली होती.

या पराभवानंतर धनंजय मुंडेंनां राष्ट्रवादीने विधानपरिषदेतून संधी दिली होती. पुढे ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता झाले. २०१४ मध्ये युतीचं सरकार आलं. पंकजा मुंडेंना ग्रामविकास मंत्रालयाबरोबरच, महिला व बालवकल्याण खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं. या कार्यकाळात पुण्यात भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांनी आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं. त्यांची महत्वांकाक्षा लपून राहीला नव्हती. आजपर्यंत महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली नसल्याने त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

चिक्की घोटाळ्याचा आरोप -

२०१५ साली पंकजा मुंडेवर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता. महिला व बालकल्याणंत्री असताना पंकजा मुंडेंवर अंगणवाडीसाठी पोषण आहार आणि इतर खरेदीसाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एकाच दिवशी २४ आदेश काढले होते. तसेच इ-टेंडर प्रक्रीया न राबवता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर राज्यात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत त्यांच्यावर बोचरी टिका केली होती.या काळात मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागला. डिसेंबर २०१६ मध्ये पंकजा मुंडेंना या प्रकरणात एसीबीने क्लीन चीट दिली होती.

२०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात चुरशीची निवडणुक झाली. यात पंकजा मुंडेंचा पराभव झाला. २०१४ ते २०१९ च्या काळात धनंजय मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड घट्ट केली होती. त्याचा फायदा त्यांना झाल्याचं बोलंल जातं. मात्र मंत्रीपद असतानाही पंकजा मुंडेचा जनतेशी संवाद खुंटला असल्याचं बोललं गेलं. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सार काही आलबेल आहे, अशी परिस्थिती नव्हती. ओबीसी नेत्यांना डावलंल गेल्याची भूमिकाही पंकजा मुंडेंनी मांडली होती.

'' माझ्या बापाचा पक्ष'' -

१२ डिसेंबर २०१९ ला गोपीनाथ मुंडेच्या जन्मदिनी त्यांनी गोपीनाथ गडावर भाषण करताना ''भाजपा माझ्या बापाचा पक्ष'' असल्याचं वक्तव्य केलं होतं, कोणी म्हणतं, ही माझ्या बापाची जागा आहे ...तसंच हा माझ्या बापाचा पक्ष आहे. असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. तेव्हा पंकजा मुंडे बंड करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, ओबीसी नेत्यांना डावलंल जातंय असा सूरही त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा उमटलाय. तसंच यापुढंच काम गोपीनाथ प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून करणार असल्याचही त्या म्हणाल्या होत्या. मात्र माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेचं रक्त असून आपण बंडखोरी करणार नाही, पक्ष सोडणार नाही हे भाषणात स्पष्ट केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT