BJP Foundation Day 
महाराष्ट्र बातम्या

BJP Foundation Day 2023: लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा निर्धार! विरोधकांना भुईसपाट करण्यासाठी आखला मास्टर प्लॅन!

Sandip Kapde

BJP Foundation Day 2023: भाजपचा आज ४४ वा स्थापना दिवस साजरा होत आहे. त्यामुळे देशभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वर्धापनदिनानिमित्त भाजपने आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपने दोन्ही निवडणुकांसाठी त्यांचे लक्ष सांगितले आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा तर विधानसभेच्या २०० जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धार महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे. बावनकुळे यांचे स्वप्न स्वप्नचं राहणार, असे विनायक राऊत म्हणाले. 

नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा जिंकण्यासाठी जीवाचे राण करायचे आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाने २०२४ मध्ये संपूर्ण बहुमताचं सरकार आणायचे आहे. २०० प्लस जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. यासाठी ३ कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप आपल्याला तयार करायच आहे. 

यापूर्वी आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होत. पण त्यानंतर लगेचच असं काही झालेलं नाही, असं सांगत त्यांनी सारवासारवही केली होती. 

जागावाटपाबद्दल काय म्हणाले होते बावनकुळे -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटप सांगितलं होतं.

यावेळी बोलताना त्यांनी भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला होता.

विरोध झाल्यानंतर केली सारवासारव -

"आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल.

शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT