CM Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

मेहुण्यावर ईडीच्या छाप्यानंतर मातोश्रीचे दरवाजे हलतायत, भाजपची ठाकरेंवर टीका

'जनता आता भाजपचे सरकार कधी येईल याची वाट पाहत आहे.'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा.लि. कंपनीवर मंगळवारी (ता.२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. पाटणकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत. ईडीच्या कारवाईत कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर टांच आणण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाखांची आहे. यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे. भाजपचे (BJP) नेते अनिल बोंडे यांनी ईडीच्या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. (BJP Leader Anil Bonde Criticize Uddhav Thackeray Over ED Raid)

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावरील ईडीच्या (Enforcement Directorate) छाप्यानंतर मातोश्रीचे दरवाजे, खिडक्या हलायला लागल्या आहेत. मंगळवारी ते स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर गेले. आजही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे, की शिवसेना आमदारांना भोजनाला बोलावले आहे. एकूण पाहाता मुख्यमंत्री ठाकरेंची अस्वस्थता लपवून राहिलेली नसल्याची टीका बोंडे यांनी केली.

भ्रष्टाचारात अडकलेल्यांना नेहमी वाटते की उद्या कोणावर कारवाई होईल. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्याबाबत भाजपकडून तारखा दिल्या जातात. यावर बोंडे म्हणाले, सरकार केव्हा पडेल हे मला माहित नाही. ते कधी पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नसल्याचे ते म्हणाले. जनता आता भाजपचे सरकार कधी येईल याची वाट पाहत असल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT