Chandrakant Patil 
महाराष्ट्र बातम्या

आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही; चंद्रकांत पाटील यांचा टोला (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि खाते वाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, एकमेकांचे आमदार पळवण्याची भीतीही वाटू लागली आहे. यासगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईतील नवीन उत्तम लोकलबद्दल 'या' आहेत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आम्ही कोणाचे आमदार फोडत नाही. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. गेल्या पाच-दहा वर्षांत भारतीय जनता पक्षात जे कोणी लोक आले ते भाजपची कार्यपद्धतीन पाहून विकासाची दृष्टी पाहून आले आहेत. आम्ही कोणालाही कोणतेही आमीष दाखवले नाही कोणालाही ईडीची धमकी दिलेली नाही.' लोकांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण जनादेश किंबहुना स्पष्ट जनादेश देऊनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. जनतेसाठीही धक्कादायक बाब आहे. यातून लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा लागले, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

विठ्ठल चरणी प्रार्थना
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात निसर्गाचं चक्र बदललं आहे. गेल्या 100 वर्षांत झाला नाही तेवढा परतीचा पाऊस झाला, तेवढचा महापूर आपण पाहिला. भारत हा ऋतू समतोल देश ओळखला जातो पण, यंदा आपल्याला निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळालं. आता ज्या काही चुका झाल्या त्या, त्यातून आम्हाला सावरण्याची शक्ती दे, अशी माझी विठ्ठल चरणी प्रार्थना आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT