Chandrashekhar Bawankule Sharad Pawar Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष, शरद पवार-उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष शोधताहेत; बावनकुळेंचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पराभवासाठी केलेल्या इंडिया आघाडीत एकवाक्यता नाही.

हेमंत पवार

सनातन हिंदू धर्माला संपवू पाहणाऱ्या इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या.

कऱ्हाड : भाजप हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर त्यांचे पक्ष कुठे आहेत हे शोधण्याची वेळ आली आहे, असं स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पराभवासाठी केलेल्या इंडिया आघाडीत एकवाक्यता नाही. श्री. मोदींना हरवून हिंदू धर्माला संपवू, असे विधान इंडिया आघाडीतील तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिनने केले. या विधानाला पवार, ठाकरे किंवा इंडिया आघाडीतील कोणीही विरोध करत नाही. म्हणजे त्यांना ही भूमिका मान्य आहे का? असा सवालही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

भाजपच्या कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघ वॉरियर्स संवाद बैठकीत आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना श्री. बावनकुळे बोलत होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भरत पाटील, सुनील काटकर, प्रमोद जठार, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर, विक्रमशील कदम, सागर शिवदास, समृद्धी जाधव आदी उपस्थित होते.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘‘शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांचे पक्ष कुठे आहेत हे शोधत आहेत. मात्र, भाजप हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. इंडिया आघाडीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्याबरोबर २८ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पराभवासाठी एकत्र आले आहेत.

सनातन हिंदू धर्माला संपवू पाहणाऱ्या इंडिया आघाडीला त्यांची जागा दाखविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी हा महाविजय २०२४ चा संकल्प पूर्णत्वास न्यावा. सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील, की नाही हे माझ्या हातात नाही. लोकसभेचे उमेदवार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल.’’

पुण्यातील ससूनमधून काही जण अवैध व्यवसाय चालवत असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. ते त्याची माहिती घेऊन तपास करून कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT