Ajit Pawar News
Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांची बदनामी स्वपक्षीयांकडूनच, भाजपच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत. अशातच भाजप नेत्याने अजित पवारांची बदनामी स्वपक्षीयांकडूनच होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते घरी असताना ते नॉट रीचेबल झाल्याच्या चर्चा रंगल्या. अशातच खारघर येथे घडलेल्या घटनेनंतर रात्री उशिरा त्यांनी जखमींची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द केल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर अजित पवार यांनी आमदारांची जुळवाजुळव केली असून त्यांच्यासोबत 40 आमदार आहेत अशा बातम्या येऊ लागल्या.

तर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा रंगली. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'अजित पवार व माझी गेल्या तीन महिन्यांपासून भेट झालेली नाही; त्याचबरोबर ते आमच्या नेत्यांच्याही संपर्कात नाहीत. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करत आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतर जाणीवपूर्वक त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत,' असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

तर पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही लक्ष केलं आहे. 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या 13 मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे यांनीही भाष्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरे हे भाजपचा पोपट असल्याची टीका केली.

त्या संदर्भात विचारले असता, बावनकुळे म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्यावर राऊत यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. उद्धव ठाकरे यांच्या कामावर टीका केल्यावर ते भाजपाचे पोपट होतात. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. ते आमचे मित्र असले, तरी चुकल्यावर सडकून टीका करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे राज हे भाजपचे पोपट होऊ शकतात का,' असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT