ajit pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kasba Bypoll Election : "सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढू नये"

पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड

सकाळ डिजिटल टीम

राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध करण्याकडे सर्वांचा कल आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप कसून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह राज्यातल्या सर्व पक्षांना विनंती केली आहे की, त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक लढू नये. तसेच राज्यातील पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा या नेत्यांनी जपावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना केली आहे.

तर पुढे कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी वेळ बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिनविरोध करण्यावर भर दिला आहे.

तर, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी संपर्क साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT