Bawankule Video Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bawankule Video : हाच 'तो' बावनकुळेंचा डिलिट झालेला व्हिडिओ; शिंदेसाठी धोक्याची घंटा!

काही वेळानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शिंदे गटाला फक्त ५० जागा देणार असल्याचं ते बोलत आहेत आणि नंतर लगेच सारवासारव करताना दिसत आहेत. काही वेळानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय बोलले बावनकुळे?

"२०२४ ची निवडणूक १०० टक्के आपलीच आहे. आपले १६० ते १७० सीट निवडूण येतील पण आपण २४० जागेवर लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापैकी शिंदेचे ५० आहेत. त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे कुणी नाहीये..." असं बावनकुळे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

जागावाटपाबद्दल बावनकुळे नंतर म्हणाले...

"आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल." असं वक्तव्य नंतर बावनकुळे यांनी केलं.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जागावाटपाचा असा काही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचं बावनकुळे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिंदे गटाला दिल्या जाणाऱ्या जागेबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप जर २४० जागांवर लढणार असेल तर शिंदे गटाला फक्त ४८ जागा मिळणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT