bjp chitra wagh ncp supriya sule esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : सुप्रिया सुळेंसह अनेकांच्या ताफ्यात 'निर्भया'च्या गाड्या; वाघ यांचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून आलेल्या गाड्या राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या ताफ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारावरुन आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकारानंतर केंद्र सरकारने २०१३मध्ये 'निर्भया निधी'ची घोषणा केली. या निधीच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांना आणि इतर उपक्रमांना चार चाकी आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत.

हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

मात्र या गाड्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या, आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचं समोर आलेलं आहे. याचसंबंधी चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

चित्रा वाघ म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून २२० वाहनं निर्भया निधीमधून खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकराने त्यांच्या काळात १२१ वाहनं ९४ पोलिस ठाण्यांना दिली. मात्र ९९ वाहानं इतर विभागांना वाटली. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी वाहनं खरेदी करण्यात आलेली होती. १९ मे २०२२ रोजी ती इतर विभागांना वाटली.

''इतर विभागांना वाटलेल्या ९९ मधल्या ९ गाड्या मंत्र्यांच्या दावणीला बांधण्यात आलेल्या होत्या. १२ वाहनं व्हीव्हीआयपींच्या ताफ्यासाठी देण्यात आली. यामध्ये छगन भूजबळ, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सुनिल तटकरे, सुभाष देसाई यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्याही ताफ्यात निर्भयाची गाडी वापरण्यात आली.''

असं सांगून चित्रा वाघ यांनी शिंदे-फडणवीसांच्या नावाने आटापीटा करुन दुटप्पीपणा करणं ताईंना शोभत नाही, असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट करुन विद्यमान सरकारचा निषेध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT