Chitra Wagh Manipur violence esakal
महाराष्ट्र बातम्या

Manipur Violence : महिलांवर अत्याचार होत असेल, तर भाजप सरकार तातडीनं कारवाई करतं; चित्रा वाघांचा विरोधकांवर निशाणा

'विरोधकांना महिलांच्या कोणत्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे नाही'

हेमंत पवार

'मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत, की महिला व मुलींच्या सुरक्षिततेचे कायदे अधिक कडक करा.'

कऱ्हाड : मणिपूरसारख्या (Manipur Violence) संवेदनशील मुद्द्यावर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा विरोधकांना चर्चेचे निमंत्रण दिले. मात्र, चर्चेसाठी कोणी आले नाही. केवळ कांगावा करत राहिले. त्यामुळे त्यांना महिलांच्या कोणत्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

भाजपशासित प्रदेशाबद्दल बोलायचे, सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. पश्चिम बंगाल, राजस्थानच्या घटनेबाबत त्यांना विसर पडतोय. आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, हेच त्यांच्याकडून पाहिले जात आहे, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विरोधी पक्षांवर केली.

महिलांवर अत्याचार होत असले, तरीही आमचे सरकार तातडीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विविध कार्यक्रमांसाठी वाघ आज कऱ्हाड दौऱ्यावर होत्या. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या, ‘‘मणिपूर भारताचा हिस्सा आहे. मणिपूरमध्ये यापूर्वी कोणतेही पंतप्रधान गेलेले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गेले आहेत. त्या नॉर्थ इस्टला भारताशी कनेक्ट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेकदा मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना पत्र दिले आहे. तरीसुद्धा ते आले नाहीत.

त्यांनी केवळ मीडियावर चर्चा केल्या. मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत, की महिला व मुलींच्या सुरक्षिततेचे कायदे अधिक कडक करा. लवकरच तो कायदा होणार आहे.’’ खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत. ते १०३ दिवस जेलमध्ये होते. एखादी व्यक्ती जेलमध्ये गेल्यावर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसा परिणाम त्यांच्यावर झाला आहे, असा टोला चित्रा वाघ यांनी खासदार राऊत यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharankumar Limbale Black and White Interview : "अस्पृश्यांपेक्षाही अधिक अस्पृश्य आयुष्य जगलो!" शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळेंची 'साम टीव्ही'वर रोखठोक मुलाखत; 'अक्करमाशी'तून मांडला वेदनेचा शिलालेख!

आंबेडकरी चळवळ हीच माझी आई! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच शरणकुमार लिंबाळे स्पष्टच बोलले

Viral Video: क्रिजवर यायला उशीर झाला अन्... स्टंप्स उडाल्यानं १ चेंडूही न खेळता स्टार खेळाडू OUT; नेमकं काय घडलं?

Teacher suspended : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी पाच शिक्षक निलंबित; पूर्वी १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद; फेरतपासणीत शून्य ते १० टक्के प्रमाण

China Surveillance: ऑपरेशन सिंदूरदरम्यान चिनी उपग्रहांकडून टेहळणी; भारतातील कोणत्या लष्करी तळांवर होती नजर?

SCROLL FOR NEXT