Amruta Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादाच्या भोवऱ्यात

गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याची चर्चा रंगली होती

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. अलीकडे त्यांच्या 'मैने मूड बना लिया है' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अमृता यांच्या या गाण्यावर उमटल्या आहेत. त्यानंतर काल अमृता फडणवीस यांनी सोशल मीडिया स्टार रियाजसोबत ' मैने मूड बना लिया है' या त्यांच्या अल्बम साँगवर डान्स केला आहे. हा त्यांचा डान्स वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीस यांची ही क्लिप त्यांच्या गाण्यामुळं किंवा रिल स्टार रियाझ आली यांच्यासोबत असल्यामुळे नाही तर ही व्हिडिओ रिल क्लिप त्यांनी सरकारी बंगल्यात शूट केल्यामुळे सध्या चर्चेत आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीस यांच्या रिलवर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, गानकोकिळा आणि नृत्यांगना अमृता फडणवीस यांना संवैधानिक पदावरील व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अशातच सत्तेचा गैरवापर करून त्यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी शेअर केलेलं रील एका सरकारी बंगल्यात बनवलेलं आहे. अमृता फडणवीस यांनी हे रील बनवताना सरकारची अधिकृतपणे परवानगी घेतली होती का हे देखील व्हायरल करा असं हेमा पिंपळे म्हणाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या त्या गाण्याची चर्चा रंगली होती. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्तानं चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. गाण्याचा ट्रेलर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. त्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करुन अमृताजींवर कौतूकाचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT