Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई पोलिसांनंतर किरीट सोमय्यांना कऱ्हाड पोलिसांनी घेतलं ताब्यात

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police) संयुक्तरित्या ही कारवाई केली. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होता. त्यावेळी कऱ्हाडला थांबण्यास ते तयार झाले.

आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतले.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वााजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून (Mahalakshmi Express) कऱ्हाडला उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील शासकीय विश्रामगृहात ते थांबले असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत. काल कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना ४ तास स्थानबध्द केलं होतं, यावेळी पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाचीही झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT