Pankaja Munde  
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : "माझ्या पराभवाचा धक्का जनतेला बसला, पण..." ; पंकजा मुंडे २०२४ साठी पुन्हा मैदानात!

सकाळ डिजिटल टीम

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. बैठकांमधून लोकांशी जोडून घेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास, सबका विश्वास हे सांगितले. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीच्या प्रचाराला जातात. जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जात असतात. जेव्हा ते निर्णय घेतात. तेव्हा ते देशाचा प्रथम नागरिक म्हणून निर्णय घेत असतात. असा नियम आमदार, खासदारांना देखील असला पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या पराभवाविषयी सुरेश धस म्हणाले सर्व मोठे नेते पराभूत झाले. पण मला पराभवाच्या वेळेमध्ये जे शिकायला मिळालं ते अभुतपूर्व आहे. माझ्या पराभवाचे दु:ख
मला न होता राज्यातील जनतेला झाले.

मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी सचिव म्हणून मिटींग घेते तेव्हा मंचावरुन मोदीजी एकही मिनिट उटत नाहीत. पुर्णवेळ ते बैठकीत लक्ष देतात, असे मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : लासलगावातून थेट व्हिएतनामला मका!

SCROLL FOR NEXT