BJP Leader Claim Shiv Sena MP Contact with BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचे १४ खासदार भाजपच्या संपर्कात, भाजप नेत्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (Shivsena) खासदार नाराज आहेत. शिवसेनेच्या एकूण १८ पैकी १४ खासदार भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत आणि ते योग्यवेळी भाजपात प्रवेश करतील, असा दावा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. येत्या २०२४ मध्ये ४८ पैकी ४० खासदार भाजपचे असतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड? -

''शिवसेनेने हिंदूत्व सोडलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार नाराज आहेत. १८ पैकी जवळपास सर्वच खासदार पालकमंत्र्यांवर नाराज आहेत. खासदारांना माहिती आहे की, ते मोदींशिवाय निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या १८ पैकी १४ खासदार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी खात्री आहे. सर्व खासदार हिंदूत्वाची भूमिका घेऊन शिवसेनेत आहेत. पण, सेनेने हिंदूत्व सोडलं आहे. त्यांच्या मतदारसंघात जनतेला उत्तर देताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे हिंदूत्वाची भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत हे खासदार येतील'', असं प्रसाद लाड म्हणाले.

दिल्लीत झाली बैठक -

खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. यावेळी खासदारांनी त्यांची नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय. तसेच आपल्या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला. अनेक खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसेच मतदारसंघात कामासाठी निधी मिळत नाही. उद्धव ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. सेना आमदारांना निधी दिला जात नाही, अशा अनेक तक्रार खासदारांनी केल्यात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आरोप करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT