Devendra Fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: त्या घटनेसंदर्भात भाजप नेता स्पष्ट बोलला; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते दावे-प्रतिदावे करताना दिसून येतात. अशातच राज्यात 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून विविध दावे-प्रतिदावे केले जातात. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

यामुळे शपथविधीच्या चर्चां पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावेळी ती चर्चा चांगलीच रंगली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असं म्हंटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत(भाजपसोबत) लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

तर पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि, 'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हालाही उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता'.

'शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला होता, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते. त्यामुळेच सरकार आले, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT