Medha Kulkarni
Medha Kulkarni esakal
महाराष्ट्र

Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचे राज्यसभेत पुनर्वसन? हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचीही चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यातच आता भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले असून या उमेदवारांनी कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू केलेली आहे. (bjp medha kulkarni and vishwas pathak names are also in discussion for Rajya Sabha candidate)

राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपतर्फे विनोद तावडे, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, हर्षवर्धन पाटील, माधव भांडारी, अमरिश पटेल आणि विजया रहाटकर या नेत्यांचे अर्ज तयार करण्याचे काम सुरू केलं आहे. यांपैकी अंतिम उमेदवार कोण हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित होणार आहे, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. (Latest Maharashtra News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अन्य राज्यांमधील भाजपच्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केलेली आहेत.

मात्र, अद्याप महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर एक मत झालेले नाही. महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते राज्यसभेचे खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांचेदेखील नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपमधील जुन्या नेत्यांपैकी नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. (Latest Marathi News)

या आठ जणांना पक्षातर्फे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगण्यात आले आहे. यातील अंतिम नावे गुरुवारी (ता. १५) नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केलेले आहे. पुणे महापालिकेत त्यांनी ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केले जाते. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये टिळक घराण्यातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपकडून ब्राह्मणांना गृहीत धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटका देखील या निवडणुकीमध्ये बसल्याने रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते.

तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना येथील ब्राह्मण समाजामध्ये आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. मात्र याचा अंतिम निर्णय १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT