Babanrao Lonikar esakal
महाराष्ट्र बातम्या

व्हायरल ऑडिओ क्लीपनंतर बबनराव लोणीकरांनी वीजबिल भरलं

मिटर काढून नेल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी वीज कर्मचाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल झाला.

सकाळ डिजिटल टीम

माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी वीज कर्मचाऱ्याला (Mahavitaran) धमकावल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं. दरम्यान लोणीकरांनी ३ लाख २१ हजार आणि ६७ हजारांच्या रकमेचं वीजबिल भरल्याची माहिती महावितरणाने दिली आहे.

मिटर काढून नेल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी वीज कर्मचाऱ्याला (Mahavitaran) धमकावल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान आज लोणीकरांनी वीजबिल भरलं आहे. एका माटरचे ३ लाख २१ हजार आणि दुसऱ्या मिटरचे ६७ हजारांचे बिल त्यांनी भरले.

वीज कर्मचाऱ्याला काय म्हणाले बबनराव लोणीकर

"नालायकांनो आम्ही बील भरतो. दोन मीटरचे मी दहा लाख रुपये बील भरलं आहे. तुमच्यामध्ये दम आहे का? हिंमत आहे का? झोपडपट्टीत जा, जे लोक आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. एका मिनिटांत तुला मी घरी पाठवीन. तुला माज चढलाय का? नोटीस न देता आमचं मीटर तुम्ही कसं काय काढून नेलं?" "तीस वर्षांपासून मी आमदार आहे, मंत्रीही होतो. तुम्हाला अक्कल पाहिजे ६० हजार रुपयांसाठी आमचे मीटर नोटीस न देता काढून नेता. असे संभाषण व्हायरल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT