Babanrao Lonikar 
महाराष्ट्र बातम्या

माझी वीज कशी कापता? झोपडपट्ट्या, दलित वस्त्यांची कापा - लोणीकर

वीज मीटर काढून नेल्यानं बबनराव लोणीकरांकडून वीज कर्मचाऱ्याला धमकी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी वीज कर्मचाऱ्याला (Mahavitaran) धमकावल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील वीज अभियंता आणि लोणीकर यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. मी तीस वर्षे आमदार असताना तुमची कारवाईची हिंमतच झाली कशी, असा दमही लोणीकर यांनी या अभियंत्याला दिला. (BJP MLA Babanrao Lonikar threatens Mahavitaran Engineer after removing electricity meter)

औरंगाबादमधील सातारा भागातील बबनराव लोणीकर यांच्या घराचं तीन लाख रुपयाचं वीजबिल थकल्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं वीज मीटर काढून नेलं. यामुळं संतप्त झालेल्या लोणीकरांनी थेट महावितरणचे अभियंते दादासाहेब काळे यांना फोन लावला आणि जाब विचारायला सुरुवात केली. ते म्हणाले, "नालायकांनो आम्ही बील भरतो. दोन मीटरचे मी दहा लाख रुपये बील भरलं आहे. तुमच्यामध्ये दम आहे का? हिंमत आहे का? झोपडपट्टीत जा, जे लोक आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. एका मिनिटांत तुला मी घरी पाठवीन. तुला माज चढलाय का? नोटीस न देता आमचं मीटर तुम्ही कसं काय काढून नेलं?"

"तीस वर्षांपासून मी आमदार आहे, मंत्रीही होतो. तुम्हाला अक्कल पाहिजे ६० हजार रुपयांसाठी आमचे मीटर नोटीस न देता काढून नेता तुम्ही. अरे नालायकांनो झोपडपट्ट्या आहेत. दलित वस्त्या आहेत. तिथं तुम्ही जात नाही. महावितरण कंपनी स्थापन झाल्यानंतर कायदे आहेत नियम आहेत. तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय असं काही करता येत नाही. आम्हाला एक फोन करायचा होता. जालन्यात आम्ही तीन लाख रुपये भरले आहेत. औरंगाबादच्या बंगल्याच्या थकबाकीचे पाच लाख रुपये भरले गेल्या वर्षी. ३५ वर्षे झालो राजकारणात आहे. जे चोरटे लोक आहेत त्यांच्या मागं लागायला तुमच्यात हिंमत आहे का? ते तुम्हाला मटण तोडायच्या सत्तूरनं तोडतील" अशा आक्षेपार्ह शब्दात आमदार लोणीकर यांनी वीज अभियंत्याशी संवाद साधला आहे.

दरम्यान, वीज कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

High Court Recruitment 2025: उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजर होण्याची संधी! 56,100 रुपये बेसिक पगार, आजच करा अर्ज

Latest Marathi News Live Update :जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Fruit Crop Insurance : दिवाळीपूर्वी फळपीक विमा योजनेचा पहिला हप्ता मिळणार, कृषीमंत्र्यांचे सुतोवाच

House Help: कामवालीने फक्त 10 लाख रुपयांच्या कर्जातून खरेदी केला 60 लाखांचा फ्लॅट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT