BJP MLA Laxman Jagtap admitted to hospital BJP MLA Laxman Jagtap admitted to hospital
महाराष्ट्र बातम्या

भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांना पुण्यातील बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (BJP MLA Laxman Jagtap admitted to hospital)

आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची प्रकृती अतिशय खालावल्यानंतर पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभाचे आमदार महेश लांडगे यांनी माहिती दिली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात (admitted) उपचार सुरू आहे. तसेस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे महेश लांडगे यांनी सांगितले. लवकर जगताप हे बरे होऊन कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी समोर येतील, असेही महेश लांडगे म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खाल्यावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे त्यांच्या प्रकृती विषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार जगताप यांनी नुकतेच अमेरिकेमध्ये उपचार घेतले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. घाबरण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी घरीच थांबावे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

रुग्णालयात गर्दी करू नका

उपचारानंतर आमदार जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दोन ते तीन दिवसांत लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. यामुळे कोणीही रुग्णालयात गर्दी करू नका, असे जगताप कुटुंबीयांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच हितचिंतक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो राहुल द्रविड होता..! रोहित शर्माचा कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गौतम गंभीरवर थेट निशाणा; संघातील वाद चव्हाट्यावर?

धक्कादायक! ‘एमबीबीएस’च्या तरुणीने जीवन संपवले; घरात घेतला गळफास, साेलापुरात खळबळ, माेबाईल पाेलिसांच्या ताब्यात..

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Women’s ODI World Cup 2025 : माजी विश्वविजेत्या इंग्लंडचा विजयासाठी संघर्ष; बांगलादेशवर चार विकेट राखून मात; हेथर नाईटची झुंज यशस्वी...

Pune Traffic : वाहतूक नियंत्रक दिव्यांचे ‘टायमर’ बंद, वाहने सुरू ठेवावी लागल्याने इंधनाचा अपव्यय; हवा प्रदूषणामुळे श्‍वसनाचे आजार

SCROLL FOR NEXT