Sanjay Raut - Ram Satpute Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

जनाब संजय राऊत, तुम्ही खुशामतगिर; राम सातपुतेंची जहरी टीका

शिवसेना अन् भाजपमध्ये नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे.

सुधीर काकडे

जनाब संजय राऊत (Sanjay Raut), तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं. कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही अशी टीका भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) मोठी की भाजप (BJP) यावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून, त्यावरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना राम सातपुते म्हणाले की, संजय ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो हे सर्व तुमचा जळफळाट करणारंच आहे. असो, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला असा खोचक सल्ला दिला आहे.

दरम्यान, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या महाविकास आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणांमुळे त्या योजनेचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही असं सातपुते म्हणाले. या सर्व प्रश्नांवर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात? असा सवात त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT