Sanjay Raut,Sanjay Kute esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत तुम्ही विश्व प्रवक्ते, खालच्या लेव्हलवर येऊ नका; संजय कुटे

संजय राऊत हे विश्व प्रवक्ते असून त्यांनी खालच्या लेव्हलवर येऊ नये.

सकाळ डिजिटल टीम

कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात तिथे आम्ही करु, असं वक्तव्य जळगाव जामोद-शेगावचे भाजप आमदार संजय कुटे यांनी काल (ता.१४ ) पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यावर आज आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावर आज संजय कुटे (Sanjay Kute) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

न्यायालयाबद्दल माझ्या वक्तव्याचा काही चॅनेल्स विपर्यास करत असून त्यावर काही नेते प्रतिक्रिया देत आहेत. संजय राऊत हे विश्व प्रवक्ते असून त्यांनी खालच्या लेव्हलवर येऊ नये. कारण संजय हे नाव इतकं खराब झालंय की मी माझं संजय हे नाव बदलण्याचा प्रयत्न करणार आहे असे संजय कुटे यांनी सांगितले. तर एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप करत न्यायव्यवस्थेवर प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. यामध्ये ५८ कोटींचा घोटाळा झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र पोलिस सोमय्यांच्या शोधात होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने सोमय्यांना दिलासा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT