Guardian Minister Satej Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपाचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश दिलेत. यासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Government) आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले असून भाजपाही निवडणुकीसाठी सज्ज आहे. दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप विविध नेत्यांकडून होत आहे. या सगळ्यातच आता सतेज पाटलांच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Satej Patil)

भाजपाने राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Elections 2022) लादल्याची भावना मविआचे नेते व्यक्त करत आहेत. सतेज पाटलांनीही अशी भावना व्यक्त केली असून ते म्हणाले, "महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने राज्यसभेची निवडणूक लादलेली आहे .ही निवडणूक बिनविरोध करणं हे अभिप्रेत होतं. महाविकास आघाडीकडे क्लियर नंबर आहेत . मतांद्वारे विजय स्पष्ट होईल . या सरकारला कुठलाही धोका नाही किंबहुना भाजपचीच मतं बाजूला जातील. त्यामुळे भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत

काँग्रेसमधल्या (Congress) नाराजीबद्दलही सतेज पाटलांनी भाष्य केलं असून कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. इम्रान प्रतापगढी हे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रबळपणे उत्तर देण्याचे प्रयत्न करत असल्याचाही दावा सतेज पाटलांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT