sharad pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांबाबत केलेलं वक्तव्य भाजप खासदाराला भोवणार? ‘त्या’ टीकेवरून कारवाईची मागणी

महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीये, ती काढून टाकावी लागेल अशा स्वरूपाचं केलं होतं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते आणि खासदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागली आहे, ती काढून टाकावी लागेल अशा स्वरूपाचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांचं हेच वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. याच टीकेवर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानकडून नाशिक पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पवार आडनावाबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही मागणी करण्यात आली आहे.

पवार आडनावाविषयी आणि पवार कुळाविषयी अपमानकारक, बदनामीकारक आणि धमकीच वक्तव्य केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यावर कलम 295 आणि 298 या तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून हल्लाबोल केला होता. यामध्ये सर्व चोर मोदी आडनावाचेच का असा सवाल उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून सुरत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर राहुल गांधी यांना त्या प्रकरणी जामीनही मिळाला आहे.

मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आणि राहुल गांधी दोषी ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. अगदी तशाच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्यावरही कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता नाशिकमध्ये करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागली आहे, ती काढून टाकावी लागेल अशा स्वरूपाचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. हीच टीका त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या या टीकेवर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बुद्धि पुरस्कर व दृष्ट भावनेच्या उद्देशाने गोपीचंद पडळकर यांनी हे व्यक्तव्य केल्याचं निवेदनात म्हंटलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील समस्त पवार कुळाच्या बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं आहे.

समस्त पवार वर्गाची बदनामी यामध्ये झाली असून मानसिक त्रास यामुळे होत आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदनच पोलीस आयुक्तांकडे देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT