Bhaskar Jadhav Sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडून मुंबईत दंगल घडवण्याचा प्रयत्न; भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

दत्ता लवांडे

मुंबई : "भाजपकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्लॅन केला जात असून मुंबईत कदाचित दंगल घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे." असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर केला आहे. रत्नागिरीतील गुवागर येथे झालेल्या शिवसेनेच्या एका सभेत बोलतताना हा आरोप केला आहे.

(Shivsena Bhaskar Jadhav on BJP)

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यासाठी सर्वांनीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीनंतर या निवडणुकाला मुहूर्त मिळणार असल्याचं बोललं जातंय. यासाठी भाजपने मोठं प्लॅनिंग केलं असून महापालिका जिंकण्यासाठी त्यांच्याकडू दंगल घडवली जाऊ शकते असा आरोप जाधवांकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर नारायण राणे आणि शिंदे गटात गेलेल्या रामदास कदम यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटाला निशाणा केला आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर बोचरी टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार फोडले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी आणि पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रात सभा आणि दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाप्रबोधन यात्रा तर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेचे आयोजन करत महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या असून भास्कर जाधव यांनी भाजपवर केलेल्या आरोपावर भाजपकडून काय उत्तर येणार याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT