Narayan-Rane sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : ''आम्ही केसाने गळा कापत नाही...'' शिंदे गटाच्या टिकेवर नारायण राणे भडकले

Narayan Rane on Ramdas Kadam : शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर खरमरीत टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिलं. हा वाद संपलेला नसून नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

संतोष कानडे

Narayan Rane on Ramdas Kadam : शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर खरमरीत टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिलं. हा वाद संपलेला नसून नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम?

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला त्रास दिला जातोय, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपमधील काही लोक अतिशय घृणास्पद काम करत आहेत. राज्यातल्या काही नेत्यांना मोदी-शाहांनी समज दिली पाहिजे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून आलेल्यांचा केसाने गळा कापू नका, असा इशारा कदमांनी दिला होता.

देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

आम्ही मित्रपक्षांचा कायम सन्मान करत आलेलो आहोत. भाजपकडे ११५ आमदारांचं संख्याबळ होतं तरीदेखील एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं. रामदास कदम यांना अशी विधानं करण्याची सवय असून ते टोकाचं बोलतात.

संजय शिरसाट काय म्हणाले?

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडणवीसांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर १०५ जणांना विरोधी बाकावर बसावं लागलं असतं. मात्र शिंदेंमुळे ते सगळे सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही बाजू खऱ्याच आहेत.

नारायण राणेंचं ट्वीट

''आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल.'' असं खरमरीत उत्तर नारायण राणे यांनी रामदास कदम यांना दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील ऊसदर आंदोलनात भाजपचा सहभाग

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT