bjp nilesh rane abusive language rane on sanjay raut and uddhav thackeray Maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : निलेश राणे Vs संजय राऊत; आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ!

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागील काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान करण्यावरून वादा सुरू आहेत. राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता राजकीय नेत्यांकडून चिखलफेक केली जात आहे.

आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना अक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर आता निलेश राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे..

भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत ही शिवीगाळ केली आहे. त्यांनी "त्या चु** उद्धव ठाकरे ला संज्या डुबवणार." तसेच "भिकार** संज्या राऊत तू जिथे दिसशील तिथेच फटके घालणार, तुला आता सोडणार नाही." असं ट्विट केलं आहे. यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

दरम्यान आज संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची चौकशी, अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

यावेळी पत्रकार राऊतांना मुख्यमंत्री शिंदेंबद्दल प्रश्न विचारू पाहत होते. पण त्यांचा प्रश्न मध्येच तोडत राऊत म्हणाले, "अरे सोड रे *** आहे तो." यामुळे आता भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. तसंच संजय राऊतांचा व्हिडीओही उपाध्ये यांनी शेअर केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? संजय राऊत महाराष्ट्राची माफी मागा."

संजय राऊतांचं पुन्हा ट्विट

यानंतर आता संजय राऊत यांनी देखील ट्विट करत केशव उपाध्ये यांना उत्तर दिलं आहे. यामध्ये तुम्हीच राजकारणाची पातळी खालच्या थराला नेली असल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी म्हटलं की, "केशवराव हे फालतू चे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्लिप दाखवा आणि कॉमेंट करा..महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात.असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : केरळमध्ये एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT