bjp Nitesh Rane criticize mp sanjay raut meet satyapal malik maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : राऊत देशद्रोही, त्यांच्यावर खटला चालवा; सत्यपाल मलिक भेटीच्या चर्चेवर भाजप नेत्याची मागणी

रोहित कणसे

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक खुलासे केले होते. यानंतर आथा उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यानी संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याचे अवाहन केले आहे.

नितेश राणे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. राणे म्हणाले की, संजय राऊतांमुळे ठाकरे कुटुंबाची बदनामी होत आहे. आज सकाळी ऐकलं ते सत्यपाल मलिक यांना भेटायला जात आहेत. हा कोण सत्यवान मलिक आहे, ज्याच्याबद्दल पाकिस्तान गोडवे गातं आहे. पाकिस्तानने पत्रक जारी करत सत्यपाल मलिक खरं बोलत असतील तर हाच भारताचा खरा चेहरा आहे असं म्हटलं आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर भरताची बदनामी करण्याचं काम हे सत्यपाल मलिक करत आहेत आणि त्याला भेटायला संजय राऊत जात आहेत.

संजय राऊत हे स्वतःला देशभक्त म्हणतात आणि जो माणूस पाकिस्तानसाठी देशाची प्रतिमा मलिन करतोय त्याला भेटायाल जात आहेत, तर सरकारला अवाहन करेल की संजय राऊत यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवा. हा देशद्रोही आहे, देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या मदत करतोय.म्हणून देशद्रोही खटलासंजय राऊत यांच्यावर चालवा अशी मागणी करून मी त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत.

हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार

राणे पुढे बोलताना म्हणाले की, ३ मेच्या नंतर मराठी माणसासाठी बेळगावला जाणार आहेत. मग पत्राचाळमध्ये पाकिस्तानी राहात होते का? 3 मेला सभा घेण्यासाठी बेळगावला जाणार असाल तर मी देखील पत्राचाळच्या सभासदांना घेऊन बेळगावला जाणार. बधू कोणते मराठी माणसं खरं बोलत आहेत ते पाहू असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT