Uddhav Thackeray  e sakal
महाराष्ट्र बातम्या

'आज फुसकी सभा'; मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून भाजपाचं राऊतांना प्रत्युत्तर

आज सायंकाळी मुंबईत बीकेसी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेची आज मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान विरोधकांकडून या सभेवर टीका करण्यात येत असून शिवसेनेकडून त्यावर प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं त्यावर भाजपाकडून फुसकी सभा म्हणत बोचरी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी "लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा !!! जय महाराष्ट्र!" असं ट्वीट केलं होतं. त्या ट्वीट ला उत्तर देताना भाजपने ट्वीट करत म्हटलंय की, "वह जिसने घर नही छोडा वह क्या मैदान में उतरेगा, देखा तुम्हारा असली चेहरा कोई बच्चा भी नही डरेगा, जय महाराष्ट्र, आज फुसकी सभा." असं ट्वीट करत शिवसेनेला टोला लावला आहे. दरम्यान शिवेसनेच्या आजच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून सायंकाळी सात वाजता बीकेसी मैदानावर सभा सुरू होणार आहे.

राज ठाकरे यांच्या तीन सभेनंतर महाराष्ट्रात भोंग्याच्या प्रकरणावरून तणाव निर्माण झाला होता. त्यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर काही मुस्लीम संघटनांकडून यासाठी विरोध करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील गृहविभागाने सतर्कता दाखवत शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या सभेनंतर शिवसेनेने आपल्या सभेची तारीख जाहीर केली होती. दरम्यान या सभेनंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे १० जूनला आयोध्येला जाणार असून ५ जूनला राज ठाकरे आयोध्येचा दौरा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT