bjp pankaja munde on cabinet expantion maharashtra politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याच्या नाराजीवर पंकजा मुंडे म्हणाल्या, कार्यकर्ते..

सकाळ डिजिटल टीम

परळी : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर तब्बल ४० दिवसानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. यादरम्यान मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भाजप मध्ये नाराजी नाट्याला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल विचारले असता मी नाराज नाही, पण कार्यकर्ते नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नाराजीच्या चर्चां रंगलेल्या असताना त्यांनी मी नाराज आहे असं काहीही नाही. मी नाराज कशामुळे होणार? उगीचच नाराज नाराज म्हणायचं. पण माझे कार्यकर्ते नाराज आहे हे खरं आहे. त्यांनी ती नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यांना मी शांत केलं आहे. त्यांना दु:ख वाटत असेल. पण ते दु:ख वाटणारच. ते साहजिक आहे , असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत

त्यांनी मंत्रिपदावरून चालेलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती देखील यावेळी बोलताना केली, त्या म्हणाल्या की, माझी विनंती आहे की नाराजी हा शब्द बाजूला करा. कार्यकर्त्यांना आवड असते की आपला नेता मोठा व्हावा. आपल्या नेत्याला कमी मिळतं, तेव्हा कार्यकर्ते प्रतिक्रिया देतात. त्यात नाराजी कसली आहे? ती लोकांची अपेक्षा असते असं देखील त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात महिलांना स्थान न दिल्याबद्दल बोलताना, महिलांना मंत्रिमंडळात स्थान देतील अशी अपेक्षा आहे, आणि तशी माझी सक्त मागणी आहे असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी बोलताना मंत्रिमंडळात म्हणून संधी न दिल्याबद्दल माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. ते पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी देतील, असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT