BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली! राज्यात बनवणार एक कोटी अँबेसेडर; काय आहे प्लॅन?

आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केला आहे. यासोबत डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती देखील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत

रोहित कणसे

आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केला आहे. यासोबत डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती देखील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खास प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार महाराष्ट्रात एक कोटी अँबेसेडर तयार करण्यात येणार आहेत.

हे अँबेसेडर लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. यांच्या माध्यमातून भाजप राज्यातील घराघरात विकासकामांची माहिती घेऊन जाणार आहे.

भाजपच्या नमो ॲप अभियानाचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी सांगितलं की, राज्यभरात प्रदेश भाजपतर्फे कोटी पेक्षा अधिक विकसित भारत अँबेसेडर बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता कमीत कमी असे १० अँबेसेडर तयार करेल असे चहल यांनी सांगितले. तसेच भाजपकडून मोदी सरकारच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे अवाहन देखील त्यांनी केलं.

चहल यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत संकल्पासोबत हे विकसित भारत ब्रँड अँबेसेडर जोडले जातील आणि मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे अँबेसेडर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज! CM फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, दिवाळीपूर्वी मिळणार मदत, ३१,६२८ कोटींच पॅकेज जाहीर

गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट! इस्रायली नागरिकाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं; 'त्या' मुलांवर सांगत होता हक्क

Akola Hospital: सर्वोपचार रुग्णालय परिसरात अश्लील चाळे! रुग्णांच्या नातेवाईकांसोबत गंभीर प्रकार : समता लॉनमधील घटनेने खळबळ

BMC Election History : 50 रुपये टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीलाच होते मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार, कधी झाली होती पहिली निवडणूक? वाचा...

Sangli Crime News : वारंवार जातीवरून अपमान, शारीरिक छळ; अमृता विषारी औषध प्यायली अन् सासू,नणंद, पतीवर गुन्‍हा

SCROLL FOR NEXT