Amit Shah
Amit Shah 
महाराष्ट्र

अमित शहा म्हणतात, शिवसेनेला 'पटक देंगे'

सकाळवृत्तसेवा

लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्तानी स्वबळावर सज्ज रहावे, युती होईल की नाही या द्विधामनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.  

लातूर येथे भाजपच्या लोकसभा क्लस्टरमधील कार्यकर्त्यांच्या बुथ मेळावा आयोजित केला होता. राज्यात सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरीही भाजप व सेना यांच्या युती बाबतीत असलेली संभ्रमावस्ता होती. ती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर केली आहे, तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीच्या कंफ्युजनमध्ये राहू नका असे आवाहन कार्यकर्त्याना करत तयारीला लागा असे म्हटले आहे. लातूर शहरात लोकसभा मतदारसंघातील चार क्लस्टरमधील बुथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. सध्या सेना व भाजपात युती बाबतीत जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली आहे.

अमित शहा म्हणाले, की आज राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांवर विजय नक्कीच मिळवू अशी प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. युतीच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका. शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक नाही झाली नाहीतर शिवसेनेला 'पटक देगे, युती झाली तर मित्राला जिंकवू, नाही झाली तर शिवसेनेला अस्मान दाखवू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT