Raosaheb Danve sakal News
महाराष्ट्र बातम्या

येत्या २ ते ३ दिवसात भाजपचं सरकार येणार? रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

जालना : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान या सत्तानाट्यात भाजपने उडी घेतली आहे, भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोरच येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. (BJP raosaheb danve hints that bjp will come to power in the state amide maharashtra political crisis)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दानवे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही जिल्ह्यात आमदार खासदारांना त्यांचा मान द्या, राज्यात गोंधळ सुरू आहे म्हणून हे म्हणत नाही, आमचं उद्घाटनाच्या पत्रिकेत नावं नसतं, अधिकार्‍यांना प्रोटोकॉल लक्षात येत नाही? सकाळी फोन करून सांगतात, ही चांगली पध्दत नाही. सरकार येतील सरकार जातील, आम्ही विरोधी पक्षात असलेलं चांगलं आहे, असं बोलता येतं. दोन तीन दिवसात हेही बंद होणार आहे, टोपे साहेब लक्ष ठेवा. असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. तसेच दोन तीन दिवसात भाजपचं सरकार राज्यात येणार का असा प्रश्न विचारला जातोय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत ही शिवसेनेतील अंतर्गत गोष्ट असल्याचे म्हटले होते, तसेच वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दरम्यान रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा भाजपने या राजकारणात उडी घेतल्याचे दिसत आहे. नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येणार का, याबाबत सूचक विधान केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT