Raosaheb Danve News saka
महाराष्ट्र बातम्या

"शिवसेनेत आता फक्त दोनच माणसं राहणार"; दानवेंची घणाघाती टीका

शिवसेनेने संजय राऊतांसारख्या पिलावळांना गप्प करावे अशा इशारा त्यांनी दिला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. दरम्यान आमदारानंतर आता खासदारांचाही शिवसेनेबद्दलचा असंतोष बाहेर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिवसेनेत आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे हे दोनच लोकं राहणार आहेत अशी बोचरी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

(BJP Raosaheb Danve On Shivsena)

शिंदे यांनी बंड केल्यावर काही माजी खासदारांनीही शिवसेनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर शिवेसनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर शिवसेनेने आपल्या लोकसभेतील प्रतोदाची बदली करत भावना गवळी यांची उडलबांगडी केली आहे.

त्यामुळे शिवसेनेला आपल्या खासदारांवरही विश्वास नाही अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते शिंदे गटात येणार असल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा द्यावा असं दानवे म्हणाले आहेत.

शिवसेनेची आणि आमची जुनी मैत्री होती, पण २०१९ मध्ये त्यांनी आम्हाला तिलांजली देत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. पण शिवसेनेच्या लोकांची नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. आणि संजय राऊतांसारख्या पिलावळांना गप्प करावे अशा इशारा त्यांनी दिला आहे.

संजय राऊत दे काही बोलत आहेत ते त्यांनी न शोभण्यासारखं आहे. त्यांनीच शिवसेनेचे तुकडे तुकडे केले आहेत. पण आतातरी त्यांना गप्प करा आणि जेवढी राहिली तेवढी तरी शिवसेना टिकवण्याचा प्रयत्न करा. शिवसेनेता आता फक्त दोनच माणसं राहणार आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. असा दावा दानवे यांनी केला आहे.

शिवसेनेला आपल्या खासदारांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे त्यांनी आता भाजपला पाठिंबा द्यावा असं भाजपचे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT