BJP vs Shiv Sena|Maha Yuti Esakal
महाराष्ट्र बातम्या

BJP vs Shiv Sena: महायुतीत फाटणार? सर्व्हेच्या नावावर आमच्या जागा कापल्या, शिवसेना आमदाराचा रोख कुणाकडे

NCP: या सर्व घडामोडींमुळे येत्या काळात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेने एकत्र कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीला समोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये महाविकास आघाडीने जबरदस्त कामगिरी करत महायुतीला दणका दिला आहे. या निकालानंतर महायुतीमध्ये धुसपूस पाहायला मिळत आहेत.

दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे महायुतीमध्ये येत्या काळात कलह पाहायला मिळू शकतो.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा केंद्रबिंदू सर्व्हे होता. या सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि काही जागांवर उमेदवार बदलावे लागले. त्याच्यामुळे आम्हाला फटका बसला आहे हे मी मान्य करतो.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, याने एक सर्व्हे आणला त्याने एक सर्व्हे आणला, हा सर्व्हे हे म्हणतोय तो सर्व्हे ते म्हणतोय यामुळे आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि याचा आम्हाला फटका बसला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ऐनवेळी शिवसेनेचे उमेदवार बदलण्यात आले होते. त्यावेळी अशी चर्चा होती की, भाजपने विविध सर्व्हेचा हावाला देत शिंदेंना उमेदवार बसलण्यास सांगितले होते. त्यामुळे आता संजय शिरसाट यांचा रोख कोणाकडे आहे हे वेगळे सांगावे लागणार नाही.

दरम्यान बारामतीतील निकालानंतर अजित पवार गटामध्येही नाराजी पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना फक्त अजित पवारांचीच मते मिळाली असल्याचा दावा केला आहे. तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी आरोप केला आहे की, बारामतीमध्ये अजित पवारांनी मित्रपक्षांच्या ज्या नेत्यांवर विश्वास टाकला त्यांनीच मदत केली नसल्याने आमचा पराभव झाला आहे.

या सर्व घडामोडींमुळे येत्या काळात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेने एकत्र कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीला समोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT