Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार, 'असा' ठरला महामंडळाच्या वाटपासाठी फॉर्म्युला?

रोहित कणसे

राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने विधीमंडळ समित्यांसह वेगवेगळ्या महामंडळ समित्यांमधील शिवसेना आणि भाजपचा वाटा कमी होणार आहे. यादरम्यान आता महामंडळाच्या वाटपासाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये ६०- २० -२० चा फॉर्म्युला असावा अशी मागणी भाजपने केली होती. मात्र तीन पक्षांमध्ये भाजपला ५० शिवसेनेला २५ टक्के आणि राष्ट्रवादीला २५ टक्के असे वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप ५० शिवसेना २५ आणि राष्ट्रवादी २५ असा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादीने धरला आणि या मागणीला आता मान्यता मिळणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती

विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती,आश्वासन समिती, यासह एकूण २५ समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांवरील आमदारांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत. साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

येणाऱ्या काळात आणखी काही महामंडळाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या नेत्यांना महामंडळावरती संधी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT