Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "९ ते १० महिने पक्षासाठी द्या"; देवेंद्र फडणवीसांचे जागावाटपावर भाजप पदाधिकाऱ्यांना आश्वासन

Sandip Kapde

Devendra Fadnavis: नागपूर येथे भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद आहे. मात्र येणाऱ्या लोकसभा निवणुकीचे अव्हान आपल्यासमोर आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी जागावाटपावर देखील भाष्य केलं.  

प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणून घ्यायची असते. ५ राज्यांची लोकसभा निवडणूल लोकसभेती तयारी म्हटलं जात होते. मात्र लोकांनी ठरवलं आहे की देशाची सुत्र मोदींच्या हातात द्यायची. देशातील समान्य माणसाच्या मनात खात्री आहे की या देशाला फक्त नरेंद्र मोदी विकसीत करु शकतात. राहुल गांधींनी सगळ्या राज्यात जाऊत ७ आश्वासन दिले होते. मात्र लोकांनी ते नाकारल्याचे फडणवीस म्हणाले. 

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत आपली ताकद आपलं नेतृत्व आहे. विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी तयार केली. फक्त मोदींना हरवणार हा त्यांच्या हेतू आहे. मात्र पाच राज्यांची निवडणुकीत त्यांना कळालं. त्यांच्यासमोर कुठला अजेंडा नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविजय २०२४ हे आपलं ध्येय आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरणार आहे. मोदींच नाव आहे म्हणून अतिआत्मविश्वात राहू नका, अशा भावनेत गेला तर मोदींची मेहनत करतात त्याला साजेशे आपल काम होणार नाही. पुढचे ९ ते १० महिने पक्षासाठी द्यावे लागतील, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं सरकार आहे. दोन्ही निवडणुका तिनही पक्ष एकत्र लढतील. कुणाला किती जागा मिळतील. याची काळजी करु नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत. त्यापेक्षा कमी मिळणार नाही. ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येईल तो देखील मोदींना पाठिंबा देईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT