Tushar Bhosale on Mosque Loudspeaker Controversy sakal news
महाराष्ट्र बातम्या

कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमांना भोंग्यांची गरज नाही : तुषार भोसले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकारण तापलं (Mosque Loudspeaker Controversy) आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तसेच राज्यात आता भोंग्यासाठी नियमावली जाहीर होणार आहे. त्यावरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही धर्माच्या दैनंदिन कार्यक्रमांना भोंग्यांची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यावर बंदीच पाहिजे, असं भोसले म्हणाले.

नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्याबाबत आदेश काढल्यानंतर भोसले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोणत्याही धर्माच्या दैनंदिन कार्यक्रमांना भोंग्याची गरज नाही. पण, सर्व धर्मियांनी आपापल्या विशेष उत्सवांसाठी ‘समान’ नियमावली तयार करुन तेवढ्यापुरतीच भोंगे लावण्याची सरकारने परवानगी द्यायला हवी, असं आचार्य तुषार भोसले म्हणाले.

राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा आम्ही भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवली. गुढीपाडव्याच्या सभेवरून झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी उत्तरसभा घेतली. त्यामध्ये मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी भोंग्यांबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

दरम्यान, नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आज भोंग्याबाबत नवीन आदेश काढले आहेत. सर्वच धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी गरजेची आहे. भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याची तरतूद असलेला आदेश त्यांनी काढला आहे. भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT