LIVE Marathi News Updates 
महाराष्ट्र बातम्या

BKC MVA Rally: "पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही"; उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

बीकेसीतील मैदानावर मविआची वज्रमुठ सभा नुकतीच पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महावस आघाडीची वज्रमुठ सभा बीकेसीच्या मैदानावर सोमवारी पार पडली. यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचं शेवटी भाषण झालं. त्यांचं भाषण संपल्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी त्यांच्य भाषणवर सडकून टीका केली. यानंतर आता मविआची वज्रमुठ सभा पुन्हा होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. (BKC MVA Rally No Vajra muth Sabha Again Shiv Sena reaction after Uddhav Thackeray speech)

माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, "मी स्वतः उद्धव ठाकरेंची लाईव्ह सभा ऐकली त्यांच्या भाषणात मला कुठेही बेस दिसला नाही. कधी बारसू, कधी पालघर, कधी चीन, कधी सत्यपाल, कधी चीन नक्की ते कशावर बोलले कळलं नाही. त्यामुळं माझ्या दृष्टीनं हा फ्लॉप शो होता. पण यानंतर कदाचित पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही, हे मविआच्या नेत्यांनी मनोमन तारलं असावं. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, असंही नेत्यांना वाटलं असेल कारण सभा सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण हे आपसांत गप्पा मारत होते. झालं बाबा एकादचं आमचं भाषण! अशा अविर्भावात ते बसले होते. त्यामुळं या सभेतून एवढा काही विशेष अर्थ काढण्याची गरज नाही"

पुन्हा सभा घेण्याची हिंमत करणार नाहीत

कारण मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता याची जाणीव झाली की, शिवसेना-भाजपचं सरकार काम करत आहे. त्यांना टोचणं किंवा बाप चोरला, गद्दार असं बोलणं आता जमणार नाही. त्यामुळं यानंतर हे पुन्हा अशी वज्रमुठ सभा घेण्याची हिंमत करणार नाहीत, अशा शब्दांत शिरसाट यांनी मविआच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.

सभा महाराष्ट्रासाठी की मुंबई पालिकेसाठी?

सर्वांचं लक्ष अजित पवारांवर होतं. त्यामुळं सर्वसामान्यांचं लक्ष अजित पवारांवर होतं. त्यामुळं सभेत त्यांनी सावधपणे आपली भूमिका मांडली. 'आजचा दिन आपका, कलका दिन मेरा' या हेतून केलेलं त्यांचं भाषण होतं. मविआची सभा ही महाराष्ट्रासाठी होती की, मुंबई महापालिकेसाठी होती? असा सवालही यावेळी शिरसाट यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT