महाराष्ट्र बातम्या

मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू; पुण्यातही हायअलर्ट जारी

पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे . याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच रायगड,मुंबईसह पुण्यामध्येही हाय अलर्टजारी करण्यात आला आहे.

सध्या मुंबईत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात घातपाताच कारण असू शकत का तसेच मुंबईत आणि स्थानिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी आणि बॉम्ब पथक यांना तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड मधील एका बोटी मध्ये शस्त्रासह साठा सापडल्यानंतर महत्वाच्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात येत आहे. रायगड,मुंबईसह पुण्यात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT