blood bank inflation blood price increased 100 to 350 rs health mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

वाढत्या महागाईचा फटका ! रक्तासाठी मोजावे लागणार जादा शुल्क

अनुदान काढले : १०० ते ३५० रुपयांनी दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रुग्णांना आता रक्ताच्या दरवाढीचाही सामना करावा लागणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पाच वर्षांनंतर रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत. या मध्ये १०० ते ३५० रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. एकीकडे रक्ताचे दर वाढले असताना, दुसरीकडे सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्तावर दिले जाणारे अनुदानही काढून घेतले आहे.

दरवाढीमुळे परिणामी रक्ताच्या पिशवीसाठी अकराशे रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी अनुदानाअंतर्गत ८५० रुपये शुल्क आकारले जात होते. सर्व काही महाग होत असल्याने रक्तपेढ्यांवर त्याचा परिणाम होतो.

म्हणून ही रक्तवाढ केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात ३३६ रक्तपेढ्या असून त्यापैकी मुंबईत ५८, पुण्यात ३५ आणि ठाण्यात २२ रक्तपेढ्या आहेत. राज्यात दररोज ४ ते ५ हजार युनिट रक्ताची गरज भासते. यापैकी केवळ मुंबईत ५०० ते एक हजार युनिट रक्त वापरले जाते.

राज्यातील सरकारी आणि निमसरकारी रक्तपेढ्यांमधून रक्त आणि रक्त घटकांच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकार सेवा शुल्क ठरवते. त्यातच नवीन सुधारित दराचा प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेने पाठवला होता. त्याला गेल्या महिन्यात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्त आणि लाल पेशी म्हणजेच रक्तातील घटक महाग झाले आहेत.

सरकारी रुग्णालयांतील रुग्णांना सूट कायम

सरकारी रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांना पूर्वीपासून रक्त मोफत दिले जाते. ही सूट यापुढेही कायम राहणार आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांनी सरकारी रक्तपेढ्यांकडून रक्त खरेदी केल्यास त्यांना नवीन शुल्क म्हणजेच अकराशे रुपये द्यावे लागणार आहेत. त्यांना यापुढे अनुदानित दरात म्हणजेच ८५० रुपयांमध्ये रक्त मिळणार नाही.

यांचे दर पूर्वीप्रमाणेच

रक्तातील घटक महागले असले तरी फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, क्रायोप्रेसिपिटेट आणि प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटच्या शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. यासोबतच प्लेटलेट ऍफेरेसिस प्रक्रिया शुल्काचे दर पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

सरकारी दर

  • रक्ताच्या पिशवीची किंमत - १,०५०

  • अनुदानाअंतर्गत पिशवी - ८५०

  • नवीन दरानुसार - १,१००

खासगी दर

  • एका पिशवीची किंमत - १,४५०

  • वाढलेले दर - १०० ते ३५२

  • नवीन दरानुसार - १,५५० ते १८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT