Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: शिंदेंच्या शिवसेना शाखेला BMC चा धक्का; केली मोठी कारवाई

शिवसेना शाखा क्रमांक 154 वर बीएमसीने हातोडा चालवला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी खरी शिवसेना कोणाची यासाठी न्यायालयात धाव घेतली. ही सुनावणी सुरू असतानाच आपल्या गटाला बळकटी मिळावी यासाठी दोन्ही गटाकडून हालचाली सुरू झाल्या. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाखा सुरू केल्या.

अशातच मुंबईतल्या चेंबूर याठिकाणी असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शाखा क्रमांक 154 वर मुंबई महानगपलिकेने हातोडा चालवला आहे. शिवसेनेच्या या शाखेवर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवून शाखा उद्धवस्त केली आहे.

शौचालयाच्या जागी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची शाखा होती. मुंबईतल्या एकनाथ शिंदेंच्या बांधण्यात आलेल्या पहिल्या शाखेपैकी ही एक शाखा होती. या शाखेला स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. मुंबई महापालिका आयुक्तच प्रशासकीय काम पाहत आहेत. महापालिका आयुक्त नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नगरविकास मंत्री आहेत, त्यामुळे महापालिकेने शिवसेना शाखेवर केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT